भारत

काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन!

मुलगा फैजल पटेल यांनी ट्वीट करून दिली माहीती

25 Nov :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

परंतु, अखेर मृत्यूशी असलेला त्यांचा लढा अपयशी ठरला असून पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्वीट करत सांगितलं की, ‘वडील अहमद पटेल यांचं आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी निधन झालं आहे.

वाचा :- ‘लव्ह जिहाद’ विरूद्धच्या कायद्यावर शिक्कामोर्तब