भारत

‘लव्ह जिहाद’ विरूद्धच्या कायद्यावर शिक्कामोर्तब

5 ते 10 वर्षांपर्यंत शिक्षेची करण्यात आली तरतूद

24 Nov :- योगी सरकारने उत्तर प्रदेशातही ‘लव्ह जिहाद’ विरूद्धच्या कायद्यावर अंतिम शिक्कामोर्तब केला आहे. उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी विवाहासाठी बेकायदेशीर धर्म परिवर्तन विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राज्य सरकारचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विवाहासाठी धोका देऊन धर्मांतर केल्या जाणाऱ्या घटना थांबविण्यासाठी तयार केलेल्या कायद्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा तयार करण्याची घोषणा केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून लव्ह जिहादच्या मुद्द्याबाबत चर्चा सुरू होती. त्यातच योगी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

वाचा :- बीड- अखेर बापानेच मुलाला स्वतःचे आतडे देऊन वाचविला जीव

पहिल्यांदा स्टेट लॉ कमिशनने आपला मोठा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे दिला होता, त्यानंतर उत्तर प्रदेशच्या गृह विभागाने याची रुपरेषा तयार करीत न्याय आणि कायदे विभागाकडून परवानगी घेतली. मिळालेल्या माहितीनुसार जो प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, यामध्ये हा कायदा तयार झाल्यानंतर याअंतर्गत गुन्हा करणाऱ्यांना 5 ते 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच लग्नाच्या नावावर धर्म परिवर्तनही करता येऊ शकणार नाही. इतकच नाही तर लग्न करणारे मौलाना वा पंडीत यांना त्या धर्माचं संपूर्ण ज्ञान असायला हवं.

वाचा :- पंकजाताईंनी साधला पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा!

कायद्यानुसार धर्म परिवर्तनाच्या नावावर आता कोणतीही महिला वा तरुणीसोबत अत्याचार होणार नाही आणि असे कृत्य करणारा सरळ तुरुंगात जाईल. एक महत्त्वपूर्ण निर्णयात अलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं की, केवळ लग्नासाठी धर्मपरिवर्तन वैध नाही. न्यायमूर्ती एससी त्रिपानी यांनी प्रियांका उर्फ समरीन व अन्य याचिकांवर सुनावणी करताना नूरजहा बेगम केसमधील निर्णयाचा हवाला दिला, ज्यात कोर्टाने लग्नासाठी धर्म बदलणं स्वीकार्य नसल्याचं सांगितलं.

वाचा :- उद्धव ठाकरेंनी केली मोदींकडे राज्यातील भाजप नेत्यांबद्दल तक्रार

वाचा :- त्यांनी मागेही सांगितले होते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’- शरद पवार