बीड

पंकजाताईंनी साधला पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा!

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार नाही- पंकजाताई

24 Nov :- बीड जिल्ह्यात आणलेल्या निधीचा साधा नारळ सुद्धा या लोकांना फोडता आले नाही, नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकादा शरसंधान साधले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणाचाही कोणाशी ताळमेळ नाही, हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, अशी दावा देखील पंकजा मुंडे यांनी केला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यात मी निधी आणला त्याचे नारळ फोडण्याची संधी या कोरोनामुळे या लोकांना मिळाली नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याचा केंद्र शासीत प्रदेश आहे. त्यामुळे ते कोणीही कोणाकडे जात नाहीत. त्यामुळे कोणाचाच कोणाला ताळाला मेळ नाही, अशी ही टीका महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. आम्हाला या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत कारायचे आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असं मत यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ बीड येथे पदवीधर मतदार व कार्यकर्ता मेळाव्यात पंकजा बोलत होत्या. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आहे हा मतदार गोपीनाथ मुंडे यांना प्रेम करणारा आहे. त्यामुळे शिरीष बोराळकर यांना अधिक मताधिक्याने जिंकणारच, अशी ग्वाही या प्रसंगी पंकजाताईंनी दिली.

वाचा :- बीड- अखेर बापानेच मुलाला स्वतःचे आतडे देऊन वाचविला जीव

या बीड जिल्ह्यात मी निधी आणला त्याचे नारळ फोडण्याचे काम या कोरोनामुळे या लोकांना मिळाली नाही, असे नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याचा केंद्र शासित प्रदेश आहे. त्यामुळे ते कोणीही कोणाकडे जात नाहीत. त्यामुळे कोणाचाच कोणाला ताळाला मेळ नाही, अशी ही टीका या सरकारवर केली आहे. आम्हाला या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत कारायचे आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असे मत याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

वाचा :- त्यांनी मागेही सांगितले होते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’- शरद पवार

पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, या सरकारने जवळपास सर्वच निर्णय पूर्णत्वास नेले नाहीत. त्यामुळे आम्ही तोंडात एक आणि ओठात एक अशी आमची प्रवृत्ती नाही. मला इतरांना गुलाल लावण्याची सवय आहे, म्हणून आम्ही शिरीश बोराळकरांना यावेळेस नकीच गुलाल लावू या, असं आवाहन पंकजा मुंडे मतदारांना केलं आहे. या मेळाव्याला आमदार भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, अक्षय मुंदडा, माजी आमदार आदिनाथ नवले, रमेश आडसकर, प्रवीण घुगे, राजेन्द्र मस्के, युवा जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

वाचा :- उद्धव ठाकरेंनी केली मोदींकडे राज्यातील भाजप नेत्यांबद्दल तक्रार

वाचा :- लॉकडाऊनच्या दिशेने महाराष्ट्राचे पहिले पाऊल?

वाचा :- राज्य सरकार मोठा धक्का देण्याच्या तयारीत; टोपेंनी दिली ‘ही’ माहिती