पंकजाताईंच्या नाराजी बाबत फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण
आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल- फडणवीस
23 Nov :- राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपापासून नाराज नसल्याचे स्पष्टीकरण अलीकडेच एका पत्रपरिषदेतून दिले आहे. ”माध्यमांकडे बातम्या नसल्या की ते पंकजा मुंडे या भाजपपासून नाराज आहेत,” या मथळ्याच्या बातच्या प्रसारित करत असल्याचा टोलाही त्यांनी प्रसार माध्यमांना दिला.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
महाविकास आघाडी शासनाविषयी बोलणे सध्यातरी योग्य नाही. कारण हे शासन गदाफटका करून स्थापित झालेले शासन आहे.राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपापासून नाराज नसल्याचे स्पष्टीकरण अलीकडेच एका पत्रपरिषदेतून दिले आहे.
वाचा :- बीड- अखेर बापानेच मुलाला स्वतःचे आतडे देऊन वाचविला जीव
महाविकास आघाडी शासनाविषयी बोलणे सध्यातरी योग्य नाही. कारण हे शासन गदाफटका करून स्थापित झालेले शासन आहे. औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार बेईमानी करून आलेले सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. त्यामुळे यावर आता बोलणे योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे नाही तर योग्य वेळी शपथ घेतली जाईल तसेच अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असे ते म्हणाले.
वाचा :- लॉकडाऊनच्या दिशेने महाराष्ट्राचे पहिले पाऊल?
वाचा :- राज्य सरकार मोठा धक्का देण्याच्या तयारीत; टोपेंनी दिली ‘ही’ माहिती
वाचा :- महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी नको- मुख्यमंत्री