राज्य सरकार मोठा धक्का देण्याच्या तयारीत; टोपेंनी दिली ‘ही’ माहिती
शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार- आरोग्यमंत्री
23 Nov :- राज्यातील कोरोना विषाणूचा कहर आटोक्यात येत असताना दिवाळीनंतर पुन्हा कोरोना विषाणूचा पसरावं वेगाने वाढू लागला आहे. दिवाळी संपल्यानंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
कोरोनाची दुसरी लाटेची भीती यामुळे आणखी वाढत आहे. या परिस्थितीबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, राज्यात सध्यातरी लॉकडाऊन लावलं जाणार नाही. मात्र जे निर्बंध उठवले गेले आहेत, त्यामुळे बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत आहेत. अशाने कोरोनाचा धोना पुन्हा वाढला आहे. त्यामुळे राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावले जाऊ शकतात, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा आहे.
वाचा :- बीड- अखेर बापानेच मुलाला स्वतःचे आतडे देऊन वाचविला जीव
लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नसल्याने राज्य सरकार कठोर निर्णय घेणार आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर याबाबत घोषणा केली जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
वाचा :- लॉकडाऊनच्या दिशेने महाराष्ट्राचे पहिले पाऊल?
लग्न समारंभासाठी जी 200 जणांच्या उपस्थितीची परवानगी दिली होती त्याबाबत पुर्नविचार केला जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर टाळेबंदीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.
वाचा :- महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी नको- मुख्यमंत्री
वाचा :- CM ठाकरेंचा कडक इशारा! राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका