महाराष्ट्र

लॉकडाऊनच्या दिशेने महाराष्ट्राचे पहिले पाऊल?

महाराष्ट्रात सरकारचा मोठा निर्णय!

23 Nov :- दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रोज 5 हजारांच्या सुमारास कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत आहे. रोजच्या आकडेवाडीवर सरकारची नजर आहे. पुढचे 15 दिवस कोरोनाग्रस्तांची आकडे वाढल्यास म्हणजे दररोज 5 हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले तर सराकर गंभीर विचार करणार आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान 4 दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमुद करण्यात आलं आहे.

वाचा :- बीड- अखेर बापानेच मुलाला स्वतःचे आतडे देऊन वाचविला जीव

कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार हळूहळू कठोर निर्णय घेणार आहे. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. 72 तासापूर्वीचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक झाले आहे. अशी माहिती वृत्त संस्थेच्या हवाल्याने मिळाली आहे.

वाचा :- महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी नको- मुख्यमंत्री