महाराष्ट्र

CM ठाकरेंचा कडक इशारा! राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका

मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात धूत राहणे हीच त्रिसूत्री- ठाकरे

22 Nov :- आतापर्यंत चांगलं सहकार्य केलं तसचं पुढं करा, कोरोना गेलेला नाही. त्यामुळे दुसरी लाट नव्हे त्सुनामी येईल अशी भीती वाटत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे आपण आधीच काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर आपल्यालाही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

दिवाळीनंतर राज्यात पुन्हा कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई हे प्रमाण जास्त आहे. उद्यापासून अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला. महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

वाचा :- लॉकडाऊन बाबत अजित दादांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरन

मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे की काय असे वाटतेय.

वाचा :- होय, मी गांजा फुकते! भरती सिंहने दिली कबुली

आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये वाढतोय आणि त्यांच्या माध्यमातून घराघरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत होतोय हे निश्चितच खूप धोकादायक आहे. आज आपल्या हातात लस नाही, कधी येईल ते सांगता येत नाही. आली तरी राज्यातल्या सर्व लोकांना अगदी दोन डोस द्यायचे म्हटले तरी 24 ते 25 कोटी जनतेला द्यावी लागेल. त्यामुळे केवळ मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात धूत राहणे हीच त्रिसूत्री आहे.

वाचा :- बीड- अखेर बापानेच मुलाला स्वतःचे आतडे देऊन वाचविला जीव