होय, मी गांजा फुकते! भरती सिंहने दिली कबुली
भारती सिंह अटक
21 Nov :- नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी कॉमेडियन भारती सिंगच्या घरी छापा टाकला. या छाप्यात तिच्या घरी गांजा मिळाला. यानंतर एनसीबीने भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना समन्स बजावून चौकशीसाठी कार्यालयात नेले. चौकशी दरम्यान भारतीने अमली पदार्थ घेत असल्याची कबुली दिली. आता या प्रकरणी भारतीला एनसीबीने अटक केली असून हर्षची अजूनही चौकशी करण्यात येत आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
एनसीबीने कॉमेडियन भारतीच्या अटकेची एका निवेदनातून पुष्टी केली आहे. भारती सिंगचं प्रॉडक्शन ऑफिस आणि घरावर एनसीबीने छापा टाकला होता, असं तपास यंत्रणेने यात सांगितलं. छाप्यात त्यांना ८६.५ ग्रॅम गांजा जप्त केला. चौकशीदरम्यान भारती आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही गांजा सेवन करत असल्याचं मान्य केलं.
वाचा :- बीड- अखेर बापानेच मुलाला स्वतःचे आतडे देऊन वाचविला जीव
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ड्रग्ज पेडररने दिलेल्या माहितीच्या आधारे अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील भारतीच्या घराची झडती घेतली. यावेळी घरातून अल्प प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
वाचा :- महाविकास आघाडी सरकार पलटूराम सरकार
एनसीबीने अनेक ठिकाणी छापा टाकत ड्रग्ज पेडलर्सना ताब्यात घेतलं. यातील एका पेडलरने भारतीचं नाव सांगितलं. भारती सिंग टीव्हीची पहिली लोकप्रिय अभिनेत्री आहे, जिच्या घरी एनसीबीने छापा टाकला आहे. यापूर्वी अभिनेता आणि मॉडेल अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांच्या घरी एनसीबीने छापा टाकला होता.
वाचा :- कधी येणार कोरोना लस? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती