भारती सिंहच्या घरावर NCB चा छापा; घरात सापडला गांजा!
भारतीसह पती NCB च्या ताब्यात
21 Nov :- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनमध्ये आतापर्यंत आश्चर्यचकित करणारी अनेक नावं समोर आली आहेत. यामध्ये आता भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया याचा समावेश आहे. ड्रगशी संबंधित तपास करण्यासाठी एनसीबीचं पथक आज सकाळी सातच्या सुमारास अंधेरीतील भारतीच्या घरात पोहोचलं.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
भारतीच्या घरात गांजा सापडला आहे. परंतु किती प्रमाणात गांजा सापडला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यानंतर एनसीबीने त्यांना समन्स बजावलं आणि दोघांना चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. कॉमेडी क्विन भारती सिंहच्या घरावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी छापा टाकला. भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांवर ड्रग्स घेतल्याचा आरोप आहे.
वाचा :- मोठी दुर्घटना! किल्ला पाहण्यासाठी गेलेली महिला कोसळली खोल दरीत
मिळालेल्या माहितीनुसार, एका ड्रग पेडलरने चौकशीवेळी भारती सिंहचं नाव घेतलं होतं. त्यानंतर एनसीबीने भारती सिंहच्या घरावर रेड (NCB Raid)टाकली. एनसीबीने एकाच वेळी तिच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तीनही घरांवर छापा टाकला आहे. भारती सिंहच्या घरावर छापेमारीसाठी एनसीबी संपूर्ण पथकासह पोहचली होती. एनसीबीच्या इतर दोन टीम तिच्या दोन वेगवेगळ्या घरावर पोहचल्या होत्या.
वाचा :- ‘या’ कारणामुळे सोनिया गांधींनी सोडलं दिल्ली शहर
मिळालेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान एनसीबीने भारती सिंहच्या घरातून गांजा जप्त केला आहे. ज्यावेळी तपासासाठी एनसीबीची टीम भारतीच्या घरी पोहचली, त्यावेळी ती आणि तिचा पती दोघेही घरातच होते. तिच्या घरी अनेक तास झालेल्या छापेमारीनंतर, एनसीबीने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया दोघांनाही समन्स बजावला आहे.
वाचा :- ट्रम्प सर्वात बेजबाबदार राष्ट्राध्यक्ष
बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीपासून याची सुरुवात झाली आणि त्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल, त्याची गर्लफ्रेण्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांच्यासह अनेक नावं समोर आली आणि त्यांची चौकशीही झाली आहे.
वाचा :- कधी येणार कोरोना लस? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती