बीड

बीड- अखेर बापानेच मुलाला स्वतःचे आतडे देऊन वाचविला जीव

वडिलांनी दिले मुलाला आयुष्यभराचे गिफ्ट

20 Nov :- तो अवघ्या दहा वर्षाचा परंतु तीन महिन्यापूर्वी कोरोना च्या संसर्गातून त्याच्या पोटातील लहान आतड्यांना इजा झाली. एवढेच काय अन्नाचा कणही त्याच्या पोटात जात नव्हता. डॉक्टरांचे पथकही त्या, मुलाचा जीव वाचवण्यासाठी कसोटीने प्रयत्न करत होते. एखाद्या दात्याकडून लहान आतडे मिळविण्यासाठी डॉक्टरांनीही प्रयत्न केले, परंतु ते शक्य झाले नाही. अखेर वडिलांनीच मुलाला स्वतःचे आतडे देऊन त्याचा जीव वाचविला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर वडिलांनी मुलाला दिलेले हे अनोखे गिफ्ट ठरले आहे. विशेषतः लहान आतड्यांच्या प्रत्यारोपण संबंधीची ही अतिशय गुंतागुंतीची व दुर्मिळ झालेली पहिलीच शस्त्रक्रिया ठरल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. कोरोना संसर्ग झालेल्या ओम संतोष घुले, या दहा वर्षाच्या मुलाला काही दिवसांनी पोटात त्रास होऊ लागला. त्याची जुपिटर हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मुलाच्या पोटातील लहान आतड्याला इजा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचे आतडे निकामी झाल्याची ही बाब तपासणीनंतर पुढे आली. तीन महिन्यात लहान आतड्याशी संबंधित गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झाल्या.

वाचा :- बीड- जावयाने सासुरवाडीत जाउन केली पत्नीची निर्घून हत्या

ओमला जेवण करता येत नव्हते. त्याचा जीव वाचविण्यासाठी त्यास लहान आतडे मिळणे गरजेचे होते. त्यादृष्टीने सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर गौरव चौबळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या पथकाने अवयव प्रत्यारोपण यावर चर्चा केली. अखेर वडिल संतोष घुले यांनी मुलाचा जीव वाचविण्यासाठी पाऊल टाकले. वडिलांनी त्यांच्या आतड्याचा एक भाग मुलाला दान करण्याचे ठरवले. त्यानुसार पूर्ण शासकिय प्रक्रिया पार पडल्यानंतर डॉ. गौरव चौबळ जठरांत्र रोगविज्ञान आणि अतिंद्रीयशास्त्रातील बालरोगतज्ञ डॉ. विष्णू बिरादर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच नोव्हेंबर 2020 रोजी काही तास शस्त्रक्रिया पार पडली.

वाचा :- मोठी दुर्घटना! किल्ला पाहण्यासाठी गेलेली महिला कोसळली खोल दरीत

सध्या मुलगा ओम व वडिल संतोष यांची तब्येत बरी आहे. लहान मुलांच्या पोटातील लहान आतडे प्रत्यारोपण करण्याची ही देशातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे. दानशुरांचे दातृत्व कामी आले, सामान्य परिस्थिती असलेल्या संतोेष घुलेंच्या कुटूंबावर अचानक कोसळलेल्या संकटामुळे दु:खाचा डोंगर कोसळला होता.

वाचा :- मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

मनोधैर्य खचूू न देता संतोष व त्याच्या परिवाराने परिस्थितीशी सामना केला. स्वत:कडील पैसे खर्च झाल्यानंतर त्यांनी मदतीचे आवाहन केले. अनेक दानशूर व्यक्तींने आपल्या परिने मोठे आर्थिक केल्याने ही अवघड शस्त्रक्रिया संपन्न झाली आहे. यापुढील उपचारासाठीही दात्यांनी संतोषच्या 9766167397 गुगल पे व मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाचा :- कधी येणार कोरोना लस? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

वाचा :- बीड- बेपत्ता मुलीचा विहिरीत सापडला मृतदेह!