बीड

PUBG Mobile India खेळण्यासाठी करावं लागणार प्री-रजिस्ट्रेशन, जाणून घ्या कशी मिळणार एंट्री

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : PUBG Mobile India लॉंचची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अद्याप तारिख घोषित करण्यात आलेली नाही आहे. सप्टेंबरमध्ये भारतात बंदी घातल्यानंतर, PUBG Corporation आता हा बॅटल रॉयल गेम देशात परत आणण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. दरम्यान, PUBG Mobile India खेळण्यासाठी पूर्व-नोंदणी देखील सुरू केली गेली आहे. Android आणि iOS युजरसाठी PUBG India खेळण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

टेक वेबसाइट बिझनेस इनसाइडरच्या मते PUBG ने भारतीय युजरटा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी मायक्रोसॉफ्टची क्लाऊड सर्व्हिस Azure ची निवड केली आहे. या नवीन प्रजोक्टसाठी PUBG ची मूळ कंपनी Krafton Inc मायक्रोसॉफ्टबरोबर हात मिळवला आहे. डेटा प्रायव्हसी आणि सुरक्षिततेच्या भारत सरकारच्या नियमांनुसार हा सेटअप तयार केला जात आहे, जेणेकरून युजरचा डेटा सुरक्षित राहिल.

इथं करा रजिस्ट्रेशन

PUBG Mobile India खेळण्यासाठी, भारतीय Android आणि iOS युजर TapTap गेम शेअर कम्युनिटीमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. ही सुविधा केवळ कम्युनिटी मेंबर्ससाठी आहे. आतापर्यंत सुमारे तीन लाख युजरने PUBG Mobile India खेळण्यासाठी नोंदणी केली आहे. TapTap स्टोअरचे रेटिंग 9.8 आहे. दरम्यान, याबाबत PUBG Corp. कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नवीन आयडीची गरज नाही

मीडिया रिपोर्टनुसार PUBG Mobile India मध्ये वापरकर्त्यांना नवीन ID तयार करण्याची गरज भासणार नाही. यामध्ये केवळ युजरचा जुना आयडीच काम करेल. या व्यतिरिक्त, PUBG Mobile India ग्लोबल व्हर्जनपेक्षा थोडा वेगळा असेल. हा गेम अपडेटेड असल्याचे सांगितले जात आहे.

बॅननंतर आता पुन्हा एंट्री

PUBG Mobile नव्या अवतारात भारतात परतण्यास तयार आहे. याची घोषणा करत दक्षिण कोरियाची कंपनी PUBG Corpने म्हटले आहे की कंपनी भारतीय बाजारासाठी एक नवीन गेम घेऊन येत आहे, जो केवळ भारतासाठी बनविला गेला आहे. PUBG Corpचे म्हणणे आहे की यावेळी कंपनीची चिनी कंपनीशी भागीदारी होणार नाही. PUBG Corpच्या मते, PUBG Mobile India खास भारतासाठी डिझाइन केलेले आहे.