राजकारण

खडसेंना कोरोनाची लागण; उपचारांसाठी मुंबईकडे रवाना!

लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत येईल- खडसे

19 Nov :- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना करोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचारांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये असंही आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी दाखल होणार आहे असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल.त्यांची प्रकृती आता चांगली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

वाचा :- आरोग्यमंत्री स्वतःवर करणार कोरोना लसीची चाचणी

एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशच्या दिवशी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांना वैतागूनच आपण पक्ष सोडल्याचं खडसे यांनी सांगितलं होतं. तसंच यापुढे राष्ट्रवादीसाठी जोमाने काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वाचा :- बीड- जावयाने सासुरवाडीत जाउन केली पत्नीची निर्घून हत्या

या घटनेमुळे चर्चेत आलेल्या एकनाथ खडसे यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितलं आहे. तर एकनाथ खडसे हे उपचारांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

वाचा :- बीड- बेपत्ता मुलीचा विहिरीत सापडला मृतदेह!

वाचा :- अन्यथा मनसे करणार राज्यभरात आंदोलन