भारत

आरोग्यमंत्री स्वतःवर करणार कोरोना लसीची चाचणी

मार्चमध्ये ही लस होणार उपलब्ध

19 Nov :- गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला कोरोना विषाणूचा धुमाकूळ काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. मात्र अजूनही कोरोनाच संकट संपलेलं नाही. कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी मेड इन इंडिया कोरोना लस कोवॅक्सिन क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. आतापर्यंत सुरुवातीच्या दोन टप्प्यातील ट्रायलमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. मात्र आता पहिल्यांदाच कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये भारतातील मंत्रीही सहभागी होणार आहे. मेड इंडिया कोरोना लस घेण्यासाठी हरयाणाचे आरोग्यमंत्री सज्ज झाले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

हरयाणामध्ये 20 नोव्हेंबरपासून कोवॅक्सिन लशीचं ट्रायल सुरू होतं आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विजदेखील सहभागी होणार आहेत. आपण ही लस घेणार माहिती राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. सिव्हिल रुग्णालयात सकाळी 11 वाजता या लशीचं ट्रायल सुरू होणार आहे. पीजाआय रोहतक आणि आरोग्य विभागाच्या देखरेखीत आपण लस घेणार असल्याचं आरोग्यमंत्री विज यांनी सांगितलं.

वाचा :- अन्यथा मनसे करणार राज्यभरात आंदोलन

भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) तयार केलेली ही लस. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. सुरुवातीला ही लस पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याआधीच ही लस लाँच केली जाणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य रजनी कांत यांनी याआधी दिली होती.

वाचा :- बीड- जावयाने सासुरवाडीत जाउन केली पत्नीची निर्घून हत्या

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार रजनी कांत म्हणाले, “लशीचा परिणाम चांगला दिसून आला आहे. प्राण्यांवरील चाचणी आणि माणसांवरील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. तशी ही लस सुरक्षित आहे मात्र तरी तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होईलपर्यंत 100% हमी देऊ शकत नाही”

वाचा :- शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांचा खर्च उचलणार राज्य सरकार!

“पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्चमध्येच ही लस उपलब्ध होईल. गरज पडल्यास या लशीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचाही सरकार विचार करत आहे”, असंही कांत यांनी सांगितलं. असं झालं तर कोवॅक्सिन ही लाँच होणारी पहिली भारतीय कोरोना लस असेल. दरम्यान भारत बायोटेकनं यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिली नाही आहे.

वाचा :- बीड- बेपत्ता मुलीचा विहिरीत सापडला मृतदेह!

वाचा :- विनायक मेटे बरसले भाजपवर