बीड- जावयाने सासुरवाडीत जाउन केली पत्नीची निर्घून हत्या
पतीनेही केला आत्महत्येचा प्रयत्न!
18 Nov : – जावयाने सासुरवाडीत जाउन पत्नीची निर्घून हत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी व भयंकर घटना बोधेगाव ता. परळी वै.येथे घडली आहे. योगीराज सोन्नर रा. होळ ता. केज असे आरोपीचे नाव असून सिरसाळा पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली आहे. मात्र त्याने स्वतः विषारी औषध प्राशन केले असल्यामुळे त्याच्यावर अंबाजोगाई च्या स्वाराती ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. याबाबत अधिक वृत्त असे की, बोधेगांव ता. परळी वै. येथील रहिवासी श्रीरंग तात्या रुपनर यांची मुलगी लोचनाबाई हिचा विवाह बऱ्याच वर्षापूर्वी श्यामराव सोडगीर रा. डोंगरगाव ता. गंगाखेड यांच्यासोबत झाला होता.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
दरम्यान त्यांना चार मुली व एक मुलगा झाला . त्यानंतर काही वर्षांनी श्यामराव सोडगीर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . पतीच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लोचनबाई सोडगीर यांच्यावर पडली. मुलांना घेवून त्या माहेरी बोधेगाव याठिकाणी मोलमजुरी करून गुजरान करत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह योगीराज सोन्नर रा. होळ ता. केज याच्याशी लावून दिला. दोघेही औरंगाबाद येथे कामासाठी गेले होते. तेथेच हात मोडल्यामुळे ज्ञानेश्वरी मागील 2 महिन्यापासून बोधेगांव येथे आईकडे राहत होती.
वाचा :- शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांचा खर्च उचलणार राज्य सरकार!
योगीराज तीला मोबाईलवर संपर्क करून सतत घरच्यांबद्दल विचारपूस करीत होता. त्याने सोमवार दि. 16 /11/2020 रोजी सासु लोचनबाई सोडगीर या डोंगरगाव याठिकाणी आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेल्याची संधी साधली. तो आपल्या मोटार सायकलवर बोधेगावला पोहोंचला. येताना बॅगमध्ये धारदार शस्त्र घेऊन आला. दिवाळी असल्याने मेहुणा वैजनाथ याने योगीराज सोबत जेवन केले. वैजनाथ शेतामध्ये गेल्यानंतर तो ज्ञानेश्वरी सोबत गप्पा मारीत बसला. गप्पा मारीत असतानाच त्याने बायकोवर धारदार शस्त्राने (कत्तीने) सपासप वार केले. डोळ्यासमोर घडणारे भयंकर दृष्य पाहुन बहिण कल्पना हिने आरडाओरड केली.
वाचा :- बीड- बेपत्ता मुलीचा विहिरीत सापडला मृतदेह!
काही अंतरावर आजोबा श्रीमंत बाबुराव रुपनर व बाळासाहेब वैजनाथ सोन्नर होते ते धावत घटनास्थळी पोहोचले.मयत ज्ञानेश्वरी चा मृतदेह मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता तर योगीराज हा विषारी औषध पिऊन बाजावर पडला होता. मानेवर तिक्ष्ण हत्याराची खोलवर जखम झाल्याने ज्ञानेश्वरी हीचा जागीच मृत्यू झाला. रुस्तुमराव गडदे यांनी घटनेची माहिती फोनद्वारे सिरसाळा पोलिस स्टेशनला कळवली.
वाचा :- पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने बजावली नोटीस
पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीस ताब्यात घेतले. मात्र त्याने विषारी औषध प्राशन केले असल्यामुळे त्याच्यावर अंबाजोगाई च्या स्वाराती ग्रामीण रुग्णालयात आयसीयु मध्ये उपचार चालू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सिरसाळा पोलीसांनी आरोपी योगीराज सोन्नर याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सपोनि डोंगरे करत आहेत. चिमुरड्या दोन मुलांची आई असलेल्या विवाहितेच्या निर्घुन हत्येमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.