बीड

बीड- बेपत्ता मुलीचा विहिरीत सापडला मृतदेह!

लँपटाँपमध्ये लिहून ठेवली होती सुसाईड नोट!

18 Nov :- दिवसेंदिवस तणावामुळे तरुणाईमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. नैराश्याला वैतागून जीवनयात्रा संवणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त तरुणांची असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना गेवराई शहराजवळील गोविंदवाडी शिवारातील एका शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अकरावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्यांनीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सायली कल्याण पारेकर (वय १६) असे मयत विद्यार्थीनीचे नाव असून तीने घरातून निघून जाण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.याबाबत माहिती अशी की, कल्याण पारेकर हे गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते शहरातील गणेश नगरमध्ये कुटुंबांसह वास्तव्यास आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा अशी अपत्य आहेत. दरम्यान सोमवारी रात्री घरातील सर्व सदस्य झोपेत असताना सायली निघून गेली. पहाटे सायली घरात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र मिळून न आल्याने कल्याण पारेकर यांनी गेवराई पोलिस ठाण्यात जाऊन सायलीला अज्ञान व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली.

वाचा :- पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने बजावली नोटीस

या मुलीने आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घरातून निघून जाण्यापूर्वी सायली हिने सुसाईड नोट लिहून लँपटाँपमध्ये ठेवली होती. यामध्ये मी मरतीय, शोधण्याचा प्रयत्न करु नका. Depression मुळ मरतीय. कोणीही माझ्या मृत्यूस जबाबदार नाही, असे लिहून पाठीमागे इंग्रजीत open it असे लिहिले आहे. हि सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

वाचा :- देशद्रोहाचा गुन्हा! कंगनाला मुंबई पोलिसांकडून तिसऱ्यांदा समन्स

बुधवारी सकाळी शहराजवळील गोविंदवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात विद्यार्थ्यांनीचा मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, पोलिस उपनिरीक्षक टाकसाळ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहीरीतून बाहेर काढला. यानंतर तो मृतदेह सायली हिचाच असल्याची ओळख कल्याण पारेकर यांनी दिली. तिच्या मृत्यूच्या बातमीने हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेह विहीरीत आढळल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात असून याप्रकरणी गेवराई पोलिस पुढील तपास करत आहे.

वाचा :- पंकजाताईंनी केले भाजप शिवसेना युतीवर भाष्य

वाचा :- अ‍ॅसिड हल्ला करणारा नराधम गजाआड!