राजकारण

पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने बजावली नोटीस

२१ दिवसांत नोटिशीला द्यावे लागणार उत्तर

18 Nov :- राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे संपत्तीचे मागील दहा वर्षांतील विवरण मागण्यात आले आहे. २१ दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. पृथ्वीराज यांना ऐन दिवाळीतच आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत त्यांनी आज माध्यमांना माहिती दिली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

या नोटिशीला २१ दिवसांत उत्तर द्यायचं असून प्रत्यक्ष हजर राहण्यासही सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने आम्ही योग्य ती कार्यवाही करत आहोत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. ही नोटीस म्हणजे आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे नमूद करतानाच चव्हाण यांनी यावेळी केंद्रातील भाजप सरकारलाही लक्ष्य केले. शरद पवार यांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर बोट ठेवत चव्हाण यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आपले परखड मत व्यक्त केले.

वाचा :- ऊर्जामंत्र्यांचा वीज ग्राहकांना करंट; कुठलीही वीज माफी मिळणार नाही!

सत्तेचा वापर कसा करायचा?, तो कोणासाठी करायचा?, याबाबत भाजपने नियोजनबद्धपणे व्यूहरचना केली आहे. त्यानुसार सगळं काही सुरू असतं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अशीच नोटीस आली होती आणि आता मला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर योग्यते स्पष्टीकरण मी देणारच आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. केंद्रातील मोदी सरकार व भाजपला तुम्ही सातत्याने लक्ष्य करत आहात.

वाचा :- आत्मनिर्भर भारत! चिनी वस्तूंच्या खरेदीत पडली मोठी घट

देशाच्या आर्थिक स्थितीपासून ते कृषी कायद्यांपर्यंत अनेक मुद्द्यांवर तुम्ही सरकारवर आरोप केले आहेत. त्यामुळेच तुम्हाला त्रास देण्यासाठी, तुमचे खच्चीकरण करण्यासाठी ही नोटीस बजावली गेली आहे असे वाटते का, असे विचारले असता तसे काही असेल असे मला वाटत नाही मात्र, सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला चांगलं माहीत आहे, इतकेच मी म्हणेन, असे विधान चव्हाण यांनी केले.

वाचा :- जयसिंगरावांनी पक्ष सोडताच पंकजाताईंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

वाचा :- पंकजाताईंनी केले भाजप शिवसेना युतीवर भाष्य

वाचा :- अ‍ॅसिड हल्ला करणारा नराधम गजाआड!