आत्मनिर्भर भारत! चिनी वस्तूंच्या खरेदीत पडली मोठी घट
भारताची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे!
17 Nov :- आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी उद्योजकांनी केलेले प्रयत्न आणि त्याला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक असल्याचे चित्र गेल्या वर्षभरात झालेल्या खरेदीतून पाहायला मिळत आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
देशातील 71 टक्के नागरिकांनी यंदा सण-सोहळ्यासाठी स्वदेशी वस्तूंची खरेदी केली आहे. तर केवळ 29 टक्के लोकांनी स्वस्तातील चिनी वस्तू घेतल्या आहेत. त्यामुळे ‘मेड इन इंडिया’ या संकल्पनेला प्रतिसाद मिळत असल्याचे ‘लोकल सर्कल्स’च्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
वाचा :- जयसिंगरावांनी पक्ष सोडताच पंकजाताईंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
यावर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात 20 भारतीय जवान शाहिद झाल्याने देशात चीन व चिनी वस्तूंच्या प्रति लोकांमध्ये चीड निर्माण झाली.त्यांनतर आत्मनिर्भर भारतची संकल्पना रुजू लागली. तसेच, आत्मनिर्भर भारतला बळ देण्यासाठी देशातील सर्वच प्रकारचे उद्योग व्यवसाय वस्तू आयात करण्याऐवजी स्वतः विविध प्रकारच्या टिकाऊ वस्तू बनवत आहेत. तर नागरिक देखील स्वदेशी वस्तुंना पसंती देत आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिनी वस्तूंची खरेदी 19 टक्क्यांनी घटली आहे. गेल्यावर्षी चिनी वस्तू खरेदी करण्याची टक्केवारी 48 टक्के होती. यावर्षी ती 29 टक्क्यांपर्यंत खाली आहे.
वाचा :- ऊर्जामंत्र्यांचा वीज ग्राहकांना करंट; कुठलीही वीज माफी मिळणार नाही!
वाचा :- पंकजाताईंनी केले भाजप शिवसेना युतीवर भाष्य
वाचा :- अॅसिड हल्ला करणारा नराधम गजाआड!