बीड

मीच खरा भाजपचा उमेदवार!

शिरीष बोराळकर हे भाजपचे डमी उमेदवार आहेत- पोकळे

17 Nov :- भाजपचे मुख्य उमेदवार शिरीष बोराळकर हेच डमी उमेदवार आहेत’ अशा शब्दात भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. रमेश पोकळेंनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे भाजपसाठी वाट अवघड झाली आहे. ‘भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर हेच डमी उमेदवार आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

शिरीष बोराळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी पदवीधरांसाठी एकही काम केलेलं नाही.सतीश चव्हाण यांनी पदवीधारांसाठी केलेली फक्त 12 कामं सांगावीत. हे दोन्ही उमेदवार घोटाळेबाज उमेदवार आहेत. पदवीधर या उमेदवारांना नाकारतील’ असा आरोप रमेश पोकळे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने ईश्वर मुंडे यांची समजूत काढून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण निश्चिंत झाले आहेत.

वाचा :- जयसिंगरावांनी पक्ष सोडताच पंकजाताईंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ईश्वर मुंडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर भाजपला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. तर भाजप बंडखोर रमेश पोकळे हे अजूनही रिंगणात असल्याने भाजपसाठी पदवीधरचा गड आता कठीण वळणावर आहे.

वाचा :- पंकजाताईंनी केले भाजप शिवसेना युतीवर भाष्य

महाविकासआघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक अगोदरपासूनच भाजपसाठी अवघड मानली जात होती. त्यामध्ये बंडखोरीची भर पडल्याने यंदा भाजपसाठी मराठवाड्याचा गड काबीज करणे जवळपास अशक्यप्राय बाब मानली जात आहे. मराठवाडा पदवीधरची आमदारकीची जागा गेल्या दोन निवडणूका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ती खेचून आणण्यासाठी भाजप शक्य ते प्रयत्न करतेय तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी राजकारणातले सगळेच छक्के-पंजे वापरून आपली बाजू भक्कम करतेय. त्यामुळे या लढाईत कोणाचा विजय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा :- अ‍ॅसिड हल्ला करणारा नराधम गजाआड!

वाचा :- ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून गोळीबार; 11 जणांचा मृत्यू

वाचा :- तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर पंकजाताई संतापल्या!