बीड

सुखद! बीड जिल्ह्यातून आज 63 रुग्ण कोरोनामुक्त

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट

17 Nov :- दिवाळीनंतर बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर पडली आहे. आज रुग्णसंख्येने शंभरचा आकडा ओलांडला आहे. मात्र आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात आज 63 रुग्णांना कोरोनामुक्तीची पावती मिळाली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कोरोनापासून योग्य खबरदारी घेतल्यास नक्कीच कोरोनापासून बचाव करता येतो. मात्र नागरिकांच्या निष्काळजीपणा कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. नागरिक आजही गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावता वावरताना दिसत आहे. सोशल डिस्टन्सचा अनेक ठिकाणी फज्जा उडताना दिसत आहे.

पंकजाताईंनी केले भाजप शिवसेना युतीवर भाष्य

आजपर्यंत बीड जिल्ह्यात 14 हजार 791 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 467 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट सध्या 11 . 07 एवढा आहे आणि रिकव्हरी रेट 91 .77 एवढा आहे.

अ‍ॅसिड हल्ला करणारा नराधम गजाआड!