राजकारण

पंकजाताईंनी केले भाजप शिवसेना युतीवर भाष्य

‘बाळासाहेब ठाकरेंबद्दल मनात आदर आहे

17 Nov :- आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्त अनेकजण त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आले होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांदेखील बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप शिवसेना युतीवर भाष्य केले.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा म्हणाल्या की, शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही. शिवसेना-भाजपची युती 2014 मध्येही तुटली होती. त्यानंतर आता पुन्हा युती तूटून राज्यात सरकार स्थापन होऊनही एक वर्ष उलटले आहे. आता या सगळ्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही.

वाचा :- अ‍ॅसिड हल्ला करणारा नराधम गजाआड!

माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्यामुळेच मी त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे आले, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. पंकजा पुढे म्हणाल्या की, ‘बाळासाहेब ठाकरेंबद्दल मनात आदर आहे. स्मृतिस्थळ असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी मी आले. बाळासाहेब पक्ष म्हणून एका विचाराचे राहू शकत नाहीत, ते सर्वांचे आहेत. बाळासाहेब आम्हा मुंडे कुटुंबासाठी आदरणीय आहेत. मुंडेसाहेब आणि बाळासाहेब यांचे घरगुती संबंध होते, अशी भावना पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली.

वाचा :- ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून गोळीबार; 11 जणांचा मृत्यू

वाचा :- तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर पंकजाताई संतापल्या!