बीड

शिवसंग्राम भवन येथे विनायक मेटेंच्या उपस्थितीत होणार महत्वपूर्ण बैठक

विभागातील महत्वपूर्ण पदाधिकारी असणार उपस्थित

16 Nov :- शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्या उपस्थितीत आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी शिवसंग्रामच्या औरंगाबाद विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसंग्रामभवन, बीड येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

या बैठकीत पदवीधर निवडणुकीबाबत शिवसंग्रामच्या भूमिकेविषयी चर्चा करण्यात येणार असून संपूर्ण विभागातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत.पदवीधर निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची हि बैठक आज दि १७ नोव्हेंबर २०२० रोजी शिवसंग्राम भवन, नगर नाका, बीड येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

वाचा :-  जिल्हाधिकारी ‘राहुल रेखावार’ यांनी दिले नवे आदेश!

या बैठकीला शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सध्या राज्यभरात विधानपरिषदेच्या पदवीधर जागांच्या विभागनिहाय निवडणूका जाहीर झाल्या असून औरंगाबाद विभागाच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा व निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

वाचा :- पंकजाताईंच्या भेटीने बालिकांच्या निरागस चेहर्‍यावर फुलले हास्य !

वाचा :- अ‍ॅसिड हल्ला करणारा नराधम गजाआड!

वाचा :- ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून गोळीबार; 11 जणांचा मृत्यू

वाचा :- तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर पंकजाताई संतापल्या!