पंकजाताईंच्या भेटीने बालिकांच्या निरागस चेहर्यावर फुलले हास्य !
आशा सदनच्या बालगृहात साजरी केली भाऊबीज
16 Nov :- बहिण – भावाचे नाते अधिक दृढ करणारा भाऊबीजेचा सण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी डोंगरी परिसरातील आशा सदनच्या बाल गृहातील अनाथ बालिकां समवेत साजरा केला. आजच्या आनंदाच्या दिवशी त्यांच्या भेटीमुळे तेथील बालिकांच्या निरागस चेहर्यावर हास्य फुलले. यावेळी त्यांनी बालिकांच्या सानिध्यात राहून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस तर केलीच शिवाय भाऊबीजेची भेटवस्तू व मिठाईही दिली.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पंकजाताई गेल्या दहा वर्षापासून सामाजिक जाणिवेतून भाऊबीजेचा सण अशा प्रकारे साजरा करतात हे विशेष! दिवाळी म्हटलं की आनंदाची पर्वणीच..अशा उत्सवात समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना सामावून घेत त्यांच्या जीवनातही आनंद निर्माण करण्याचे काम पंकजाताई मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. आजचा भाऊबीजेचा दिवस त्यांनी या बालिकांच्या सहवासात घालवला. डोंगरी परिसरातील महाराष्ट्र राज्य वुमन्स कौन्सिल आशा सदन या बालगृहाला आज दुपारी त्यांनी भेट देऊन तेथील बालिकां सोबत कोरोनाचे नियम पाळून भाऊबीज साजरी केली.
वाचा :- जिल्हाधिकारी ‘राहुल रेखावार’ यांनी दिले नवे आदेश!
दिवाळीचा फराळ, मिठाई तसेच आवश्यक वस्तू त्यांनी यावेळी त्यांना भेट स्वरूपात दिल्या आणि त्यांच्याशी संवादही साधला. पंकजाताईंच्या मनमोकळ्या संवादाने त्या निरागस बालिकांच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला. आशा सदनच्या अधीक्षक ज्योती टेमकर, बेला माहीमसुरा, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री वाडिले आदी यावेळी उपस्थित होत्या.
वाचा :- अॅसिड हल्ला करणारा नराधम गजाआड!
यावेळी उपस्थित माध्यमांशी बोलताना ना. पंकजाताई म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षापासून मी राज्यातील विविध ठिकाणी वंचित, उपेक्षित, अनाथ मुलांसोबत दरवर्षी मुलाचा वाढदिवस, स्वतःचा वाढदिवस तसेच भाऊबीज अशा प्रकारे सामाजिक जाणिवेतून साजरी करते. मला यातून आनंद व समाज कार्याची प्रेरणा मिळते. आजची भाऊबीजही दरवर्षीप्रमाणे माझ्या सदैव स्मरणात राहील.
वाचा :- ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून गोळीबार; 11 जणांचा मृत्यू
वाचा :- तरुणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर पंकजाताई संतापल्या!