बीड

जिल्हाधिकारी ‘राहुल रेखावार’ यांनी दिले नवे आदेश!

नियम व अटींचे करावे लागणार काटेकोरपणे पालन

16 Nov :- राज्य शासनाने प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक 16 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करणेसाठी मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. या अनुषंगाने बीड जिल्हयातील केवळ कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक 16 नोव्हेंबर 2020 पासून खुली करणेसाठी मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस आधीन राहून परवानगी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कोव्हीड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे खुले राहण्याच्या वेळेबाबत संबंधित विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी स्थानिक तहसिलदार यांच्या संमतीने निर्णय घ्यावा. मास्क परिधान करणे, शारिरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे कडील दिनांक 29 जून 2020 रोजीच्या आदेशामध्ये त्या त्या जिल्हयातील परिस्थिती प्रमाणे संबंधीत जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांना जिल्हयातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढणेबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत.

वाचा :- नवनीत राणा आणि रवी राणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

यापूर्वीच्या आदेशानुसार जिल्हयातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत वाढविणेत आहे. सर्व संबंधित कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांचे कडून पुढिलप्रमाणे नमुद मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबत तपासणी करणेचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थानी देण्यात आले असून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यामधील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

वाचा :- तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर पंकजाताई संतापल्या!

वाचा :- ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून गोळीबार; 11 जणांचा मृत्यू

वाचा :- बीड कोरोना ब्रेकिंग! आज 80 रुग्ण पॉझिटिव्ह!!