राजकारण

नवनीत राणा आणि रवी राणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुख्यमंत्र्यांना भेटू न देणं म्हणजे लोकशाहीची हत्या

15 Nov :- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर आंदोलनासाठी निघालेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्त कार्यालयात नेलं आहे. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू न देणं म्हणजे लोकशाहीची हत्या, असा घणाघाती आरोप राणा दाम्पत्यानं केला आहे. तर खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती.

वाचा :- ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून गोळीबार; 11 जणांचा मृत्यू

रविवारी अखेर आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा कोर्टानं जामीन मजूर केला. रवी राणा यांच्यासह अटकेतील शेतकऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर येताच आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं होतं.

वाचा :- तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर पंकजाताई संतापल्या!

राज्य सरकारवरही त्यांनी गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचं आमदार राणा यांनी म्हटलं आहे. हजारो शेतकऱ्यांसह सोमवारी (16 नोव्हेंबर) ‘मातोश्री’वर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

वाचा :- अ‍ॅसिड हल्ला करणारा नराधम गजाआड!

वाचा :- राज्यातील धार्मिक स्थळे पाडव्यापासून उघडणार