बीड

अ‍ॅसिड हल्ला करणारा नराधम गजाआड!

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे केली अटक

15 Nov :- अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणारी बीडमधील अ‍ॅसिड टाकून तरुणीची हत्या प्रकरणी अखेर नराधम प्रियकाराला अटक करण्यात आली आहे. अविनाश राजुरे या आरोपीला अखेर नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथं पोलिसांनी ताब्यात आहे. घटनेच्या अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आरोपी अविनाश राजुरे याने आपली प्रेयसी सावित्रा अंकुलवार हिच्यावर बीडमधील येळंब (घाट) परिसरात अ‍ॅसिड टाकून पेट्रोलने पेटवून दिले होते. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली. अखेर 24 तासांच्या आता नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून अविनाश राजुरेला अटक केली आहे. त्याला लवकरच बीड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

वाचा :- तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर पंकजाताई संतापल्या!

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22) तरुणी याच गावातील अविनाश राजुरे नावाच्या तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते.

वाचा :- ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून गोळीबार; 11 जणांचा मृत्यू

पहाटे 3 वाजेच्या सुमारास येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने रस्त्याच्या बाजूला अगोदर तरुणीवर अ‍ॅसिड टाकले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेत सावित्रा 48 टक्के भाजली होती. मात्र, उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला.

वाचा :- राज्यातील धार्मिक स्थळे पाडव्यापासून उघडणार

वाचा :- शिक्षक, विद्यार्थी, आणि पालकांच्या तक्रारी त्वरीत सोडवा