बीड

तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर पंकजाताई संतापल्या!

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी

15 Nov :- बीडमध्ये प्रियकराने प्रेयसीवर अ‍ॅसिड टाकून पेट्रोलने पेटवून दिल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही या ‘प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी’, अशी मागणी केली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये सावित्रा अंकुलवार तरुणीच्या हत्ये प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘दिवाळी सण असताना, पाडवा आणि भाऊबीज उद्या होणार आहे. हा सण महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण काही विकृत घटना घडताना दिसत आहे. दिवाळीच्या दिवशी असं काही बोलावं लागणे दुर्दैवी आहे’ अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. तसंच, ‘महिला अत्याचार गोष्टी राज्यात सातत्याने होत आहे. अशा गोष्टी थांबवण्यासाठी वेगळी फोर्स तयार करण्याची आवश्यकता आहे.

वाचा :- बीड- प्रियकरानं केला प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला!

फास्ट ट्रॅकमध्ये असे खटले चालवले पाहिजेत. मी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बीडचे एसपी यांच्याशी बोलणार आहे’ असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान, या प्रकरणावर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

वाचा :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी

वाचा :- शिक्षक, विद्यार्थी, आणि पालकांच्या तक्रारी त्वरीत सोडवा