बीड- प्रियकरानं केला प्रेयसीवर अॅसिड हल्ला!
पीडित तरूणीचा उपचारा दरम्यान मृत्यू!
15 Nov बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. 22 वर्षीय प्रेयसीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न प्रियकरांनं केला होता. या पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, उपचारा दरम्यान या पीडित तरूणीचा मृत्यू झाला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात ही घटना घडली. सावित्रा (वय 22) असं पीडित तरूणीचं नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही दिवाळीनिमित्त पुण्याहुन दुचाकीवरून गावी परतत होते.
वाचा :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी
गावी परतत असताना पहाटे 3 च्या दरम्यान बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवली. त्यानंतर या तरूणाने तरुणीवर अॅसिड टाकले. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरूणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. घटना घडल्यानंतर जवळपास 12 तास तरूणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती.
वाचा :- तर तुमच्या पापांचे सांगाडे जास्त सापडतील
रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिलं. त्यावेळी पीडित तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर संबंधित लोकांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. तसेच सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
वाचा :- शिक्षक, विद्यार्थी, आणि पालकांच्या तक्रारी त्वरीत सोडवा