राजकारण

तर तुमच्या पापांचे सांगाडे जास्त सापडतील

खासदार संजय राऊत यांनी दिला इशारा

14 Nov :- किरीट सोमय्या यांनी खोटे-नाटे आरोप करणं बंद करावं. तसेच जुनी थडगी त्यांनी उकरुन काढून नयेत, कारण आम्हालाही थडगी उकरतात येतात. पण आम्ही ती उकरली तर त्यात तुमच्या पापांचेच सांगाडे जास्त सापडतील, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सोमय्या यांना त्यांच्या पक्षातच गांभीर्यानं घेतलं जात नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “सोमय्यां यांनी आम्ही काही बोलावं अस कोणतंही महान त्यांनी केलेलं नाही. ते जे करतात त्याच्याकडे त्यांचा पक्षही गांभीर्याने पाहत नाही. यामुळे अशा विधानांमुळे आपल्याच पक्षावरील लोकांचा विश्वास उडतो याचं त्यांनी भान ठेवावं. हे खोटे नाटे आरोप करणं बंद करावं, जुनी थडगी उकरायची म्हटलं तर आम्हालाही उकरता येतात. ती आम्ही उकरली तर त्यात तुमच्याच पापांचे सांगाडे जास्त सापडतील.

वाचा :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी

“मला वेडं ठरवण्यासाठी संजय राऊत आणि शिवसेना नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा” असं सोमय्या यांनी म्हटलं होतं. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला पण सरकारला थोडंही खरचटलं नाही. असे अघोरी प्रयत्न त्यांनी केले. त्यामुळे त्यांनी ही भाषा बंद केली पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी कल्याणासाठी सहकार्याची भावना ठेवावी.

वाचा :- शिक्षक, विद्यार्थी, आणि पालकांच्या तक्रारी त्वरीत सोडवा