महाराष्ट्र

शिक्षक, विद्यार्थी, आणि पालकांच्या तक्रारी त्वरीत सोडवा

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आदेश

14 Nov :- शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न, शाळांच्या फीबाबत विद्यार्थी, पालकांच्या तक्रारी त्वरीत सोडवा, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. बच्च कडू पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी आधी ‘बालभारती’ला भेट दिली. त्यानंतरच अचानक पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे धाव घेतली. यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कडू यांनी यावेळी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील, प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, विभागीय शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, सहसंचालक मीना शेंडकर, धनाजी बुट्टे, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे आदी अधिकारी उपस्थित होते.

वाचा :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी

काही शाळांच्या फी वसुलीबाबत व अनागोंदी कारभाराबाबत पालकांनी थेट बच्चू कडू यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. शिक्षक व कर्मचाऱ्यांचेही विविध प्रश्‍न अनेक दिवसांपासून रखडले होते. यावर कडू यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तक्रारी दाखल झाल्यानंतर संबंधित शाळांना भेटी देऊन तपासणी करणे आवश्‍यक आहे. वस्तुस्थितीचे अहवाल तयार करुन त्यावर योग्य ती कार्यवाही होणेही आवश्‍यक आहे. काही प्रकरणे त्वरीत निकाली काढावीत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.