बीड

पंकजाताई मुंडेंकडे मोठी जबाबदारी!

पंकजाताईसह तावडे, विजया रहाटकर सुनील देवधर यांच्यावरही जिम्मेदारी

13 Nov :- भारतीय जनता पार्टीने शुक्रवार 36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी पक्षाचे प्रभारी आणि सह प्रभारींची सूची जारी केली आहे. यानुसार महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये विनोद तावडे यांची हरियाणा प्रदेश भाजप प्रभारीपदी, सुनील देवधर यांची आंध्रप्रदेश सह प्रभारी पदी, पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेश सह प्रभारी पदी आणि विजया रहाटकर यांची दमन दीव – दादरा – नगर हवेली प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवी असतील.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

रवी यांच्याकडे महाराष्ट्रासह गोवा आणि तामिळनाडूचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर येत्या काळात महत्त्वाच्या असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदी राधा मोहन सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पश्चिम बंगालची जबाबदारी कैलास वर्गिय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आज भाजपच्या केंद्रीय स्तरावर अनेक संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांकडे अनेक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बिहार निवडणुकांच्या यशानंतर भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

वाचा :- जाणून घ्या! दिवाळीनंतर कोणकोणत्या राज्यात शाळा सुरु होणार

केंद्रीय स्तरावर संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून अनेक राज्यांचे प्रभारी बदलण्यात आले आहेत. आगामी काळात प. बंगाल आणि उ. प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांकडे भाजपा पक्षश्रेष्ठींचे विशेष लक्ष असणार आहे. राज्यातून केंद्रात गेलेल्या भाजपाच्या नेत्यांनाही या फेरबदलात मोठी जबाबदारी मिळाली आहे. राज्याचे माजी शिक्षणमंत्री असलेल्या विनोद तावडे यांना हरियाणा भाजप प्रभारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेश सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वाचा :- नवनीत राणा यांनी दिला ठाकरे सरकारला इशारा

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पंकजा नाराज असल्याची चर्चा होती. तर ईशान्य भारतात भाजपाला मोठे यश मिळवून देणाऱ्या सुनील देवधर यांच्याकडे आंध्रप्रदेश सह प्रभारी पद देण्यात आले आहे. दक्षिण भारतात येत्या काळात भारतीय जनता पक्ष वाढविण्याची जबाबदारी देवधर यांच्याकडे असेल. तर माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे दमण-दीव-नगर हवेली प्रभारी पद देण्यात आले आहे.

वाचा :- ‘या’ राज्यातील आपत्तीग्रस्तांना केंद्र सरकारची मदत जाहीर

वाचा :- अर्जुन रामपालने केला ड्रग्स कनेक्शन बाबत खुलासा