क्रीडा

अनेक युवा खेळाडूंना प्रतिभा दाखवण्याची संधीच मिळत नाही

टीम वाढवण्याच्या मुद्द्यावर दिली प्रतिक्रिया

13 Nov पुढच्या वर्षीच्या मोसमात आयपीएल (IPL)ची टीम वाढवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. 2021 साली 9 टीम आणि 2022 साली 10 टीमची आयपीएल खेळवण्याची बीसीसीआयची योजना आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यानेही टीम वाढवण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आयपीएलचा विस्तार व्हावा, त्यामुळे आणखी युवा आणि प्रतिभावान खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल, असं मत द्रविडने व्यक्त केलं आहे. तसंच सध्या कमी टीम असल्यामुळे अनेक युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधीच मिळत नसल्याची खंत द्रविडने बोलून दाखवली. राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्स टीमचे सह-मालक मनोज बडाले यांचं पुस्तक ‘अ न्यू इनिंग्ज’ याचं ऑनलाईन लॉन्चिंग केलं. त्यावेळी आयपीएलच्या टीम वाढवण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, कारण यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडूंची नावं आणि चेहरे समोर आले आहेत, अशी प्रतिक्रिया राहुल द्रविडने दिली.

वाचा :- जाणून घ्या! दिवाळीनंतर कोणकोणत्या राज्यात शाळा सुरु होणार

राजस्थान टीमचे सह-मालक मनोज बडाले यांनीही द्रविडच्या या मताशी सहमत असल्याचं सांगितलं. ‘आयपीएलमुळेच हरियाणाचा राहुल तेवतिया जगाला दिसला. याआधी खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये निवड होण्यासाठी राज्य संघावर अवलंबून होते. हरियाणासारख्या राज्यात युझवेंद्र चहल, अमित मिश्रा आणि जयंत यादव यांच्यासारख्या शानदार स्पिनरसमोर तेवतियाला कमी संधी मिळाल्या असत्या.

वाचा :- ‘या’ राज्यातील आपत्तीग्रस्तांना केंद्र सरकारची मदत जाहीर

आयपीएलमध्ये खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळता त्याचा अनुभव मिळतो. प्रशिक्षक म्हणून आम्ही युवा खेळाडूंना त्यांच्या प्रवासात मदत करू शकतो, पण यासाठी त्यांना अनुभवाची गरज लागतेच. तुम्ही देवदत्त पडिक्कलला विराट आणि एबी डिव्हिलियर्ससोबत खेळताना बघता, याचा त्याला नक्कीच फायदा होईल’, असं वक्तव्य द्रविडने केलं.

वाचा :- अर्जुन रामपालने केला ड्रग्स कनेक्शन बाबत खुलासा

वाचा :- माझे चित्रपट सामान्य प्रेक्षकांसाठी असतात