माझे चित्रपट सामान्य प्रेक्षकांसाठी असतात
माझे चित्रपट समीक्षकांना कधीच आवडत नाहीत
13 Nov :- ओटीटीवर अक्षयकुमारचा बहुचर्चित लक्ष्मी प्रदर्शित झाला. सिनेमाची उत्सुकचा आधीपासून होतीच. हा चित्रपट दक्षिणी चित्रपटावर बेतला आहे ही एक गोष्ट. पण या चित्रपटातला अक्षयचा रोल पाहता त्यात तो काय वेगळं करतो याचा विचार सातत्याने त्याचे फॅन्स करत होते. लक्ष्मी प्रदर्शित झाला आणि अक्षय कुमारला या चित्रपटाचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. समीक्षकांनी हा चित्रपट म्हणजे पुरेपूर अपेक्षाभंग असल्याचं म्हटलं. अनेकांनी हा फीडबॅक दिल्यावर अक्षय बोलता झाला.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
अक्षयकुमारने केलेला प्रत्येक चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरला आहे. गेल्या पाच वर्षापासून तर अक्षय करेल तो चित्रपट यशस्वी ठरतो आहे. पण या त्याच्या घोडदौडीला लक्ष्मी या चित्रपटाने ब्रेक लावला. मूळ कंचना या दक्षिणी चित्रपटावर बेतलेल्या या चित्रपटाने रसिकांची घोर निराशा केली. यावर अक्षय म्हणाला, अनेक समीक्षकांनी चित्रपट चांगला नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी त्यांचं काम केलं. समीक्षकांचं म्हणणं मी खोडून काढत नाही. पण मी चित्रपट समीक्षकांसाठी बनवतच नाही.
वाचा :- जाणून घ्या! दिवाळीनंतर कोणकोणत्या राज्यात शाळा सुरु होणार
माझे चित्रपट सामान्य प्रेक्षकांसाठी असतात. त्यांना चित्रपट आवडणं महत्वाचं असतं. माझ्या प्रेक्षकांना हा सिनेमा आवडतो की नाही हे महत्वाचं. हे बोलता बोलता आणखी एक टिप्पणी अक्षयने केली आहे. तो म्हणतो, माझे चित्रपट समीक्षकांना कधीच आवडत नाहीत. पण ते त्यांच्यासाठी नसतात. त्याच्या या वक्तव्यानंतर मात्र समीक्षक मंडळी काहीशी नाराज झाली आहेत.