सिनेमा,मनोरंजन

अर्जुन रामपालने केला ड्रग्स कनेक्शन बाबत खुलासा

अर्जुन रामपालची NCB केली 7 तास चौकशी

13 Oct :- अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आले आहे. ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल याची गेल्या 7 तासांपासून NCB कडून चौकशी सुरू होती. सध्या चौकशी संपली असली तरी उद्या पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. NCB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 7 तास अर्जुनशी चौकशी सुरू होती.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

चौकशी पूर्ण झाल्यानंतर एनसीबी कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर अर्जुनने माध्यमांशी संवाद साधला. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन रामपालने सांगितलं की, एनसीबी चांगलं काम करीत आहे. मी अमली पदार्थ विरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीला सहकार्य करीत आहे. माझा ड्रग्जशी काहीही संबंध नाही. घरी जे औषधे सापडले आहेत त्याचं प्रिस्किप्शन देण्यात आलं आहे. ड्रग्ज प्रकरणात ज्या लोकांची चौकशी केली जात आहे ते माझ्या वर्तुळातील असल्याने माझीही चौकशी केली जात आहे. एनसीबीने आज सकाळी अर्जुनचा जवळचा मित्र पॉल ग्रियाड याला अटक केली आहे.

वाचा :- जाणून घ्या! दिवाळीनंतर कोणकोणत्या राज्यात शाळा सुरु होणार

एनसीबीने पॉलची गुरुवारी चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला अटक केली आहे. त्यांची आणखी चौकशी केली जाणार आहे. पॉल हा एक ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट आणि मुंबई येथे राहणारा व्यापारी आहे. पॉल हा अर्जुन रामपालचा जवळचा मित्र आहे. अर्जुनच्या गर्लफ्रेंडचा भाऊ अ‍ॅगिसिलास डीमेट्रिएड्स याच्याशी पॉलचा व्यावसायिक व्यवहार होता. एनसीबीने दावा केला आहे की, पॉल अ‍ॅजिसिलोसकडून बंदी असलेली औषधं खरेदी करीत होता. या प्रकरणात अटक करण्यात येणारा पॉल हा दुसरा परदेशी नागरिक आहे.

वाचा :- ‘या’ राज्यातील आपत्तीग्रस्तांना केंद्र सरकारची मदत जाहीर

वाचा :- नवनीत राणा यांनी दिला ठाकरे सरकारला इशारा