नवनीत राणा यांनी दिला ठाकरे सरकारला इशारा
मातोश्री बंगल्यासमोर आंदोलन करणार
13 Nov :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती व आमदार रवी राणा हे गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
‘शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यासमोर येणाऱ्या 15 नोव्हेंबर रोजी आंदोलन करू,’ असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. अतिवृष्टी व विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने आमदार रवी राणा यांनी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या दरम्यान रवी राणा यांच्यासह 110 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असल्याने खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत राज्य सरकारला इशारा दिला आहे.
वाचा :- जाणून घ्या! दिवाळीनंतर कोणकोणत्या राज्यात शाळा सुरु होणार
शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी व लॉकडाऊन काळात आलेली वीज बिले माफ करण्यात यावीत, यासाठी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्यासह 110 शेतकरी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
वाचा :- ‘या’ राज्यातील आपत्तीग्रस्तांना केंद्र सरकारची मदत जाहीर
यावेळी राष्ट्रीय महामार्गावर टायरची जाळपोळही करण्यात आळी. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्याने आम्ही सुद्धा जेलमध्ये दिवाळी साजरी करू, असा इशारा रवी राणा यांनी दिला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. तर सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली.
वाचा :- अर्णब गोस्वामींना अखेर सुप्रीम कोर्टाचा दिलासा; अंतरिम जामीन मंजूर