बीड

अर्णब गोस्वामींना अखेर सुप्रीम कोर्टाचा दिलासा; अंतरिम जामीन मंजूर

मुंबई, 11 नोव्हेंबर :  रिपब्लिक टीव्ही चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अखेर सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला आहे.

वास्तूविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी (anvay naik suicide case) अटकेत असलेले रिपब्लिक टीव्ही (Republic TV editor ) वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami)यांची त्यामुळे न्यायालयीन कोठडीतून सुटका होणार आहे.

अर्णब गोस्वामीसह दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार अर्णबसह नितेश आणि फिरोज यांना अलिबाग शहरातील नगरपरिषद एक नंबर शाळेत कैद्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटर जेलमध्ये ठेवण्यात आले होते.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता या दोन्ही सहआरोपींसह अर्णब गोस्वामी यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

अन्वय नाईक यांची मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाची कंपनी होती. मे 2018 अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यात एक सुसाईट नोट आढळून आली होती. त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले पैसे थकविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद केले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

SC ने महाराष्ट्र सरकारला दिला सल्ला

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारला सल्ला दिला आहे. महाराष्ट्र सरकारनं अर्णब गोस्वामी यांच्या टीव्हीवरील वक्तव्याकडे दुर्लक्ष करायला हवं, असं न्यायाधीक्ष चंद्रचूड यांनी सांगितलं. मी अर्णब गोस्वामी यांची वाहिनी पाहत नाही. त्यांचा विचार देखील वेगळा असू शकतो. न्यायालयात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व आहे, ही पद्धत योग्य नाही, असं मतही सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे.