देश विदेश

‘या’ कारणांमुळे ट्रम्प यांच्यावर आली तुरुंगात ज्याची वेळ

राष्ट्राध्यक्ष पदावर असताना ट्रम्प अनेकदा सुटले होते

10 Nov :- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प हरले आहेत. असे असले तरी त्यांच्यावरील संकट कमी होताना दिसत नाही. आगामी काळात आर्थिक घोटाळे, निवडणूक घोटाळे आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ट्रम्पंना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात काही घोटाळे झाले होते. इतकेच नाही तर त्यांच्या खासगी व्यवयसातही आर्थिक स्थिती बिकट आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राष्ट्रपती असताना या खटल्यांपासून ट्रम्प दूर होते, पण आता राष्ट्राध्यक्षपद गेल्याने हे खटले त्यांच्यावर चालवले जाणार आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर बँकेशी केलेला गैरव्यवहार, मनी लाँड्रिन्ग, निवडणुकीत केलेले घोटाळे यावर आरोप लागू शकतात.सध्या माध्यमांमध्ये फक्त आर्थिक घोटाळ्यांबाबत चर्चा केली जाते आहे. पण प्रशासकीय यंत्रणेतही ट्रम्प यांनी खूप घोळ घातल आहे.

वाचा :- राज्यातील शाळा ‘या’ सुरक्षित पद्धतीने होणार सुरु

ट्रम्प यांच्या डोक्यावर कोट्यवधींचे कर्ज असल्याने कर्जदार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. पुढील चार वर्षात ट्रम्प यांना 30 कोटी डॉलरहून अधिक कर्ज फेडायचे आहे. त्यात आधीच अमेरिकेत आर्थिक मंदी आहे त्यामुळे ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. प्रशासकीय विभागातही ट्रम्प यांनी अनेक घोटाळे केल्यचा आरोप आहे. या तपासाचा आता ट्रम्प यांच्या विरोधात वापर केला जाऊ शकतो.

वाचा :- मोठी बातमी! उपचारासाठी धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल

2018 साली ट्रम्प यांचे सहकारी मायकल कोहे निवडणुक प्रक्रियेत गडबड केल्याप्रकरणी दोषी आढळले होते. तसेच 2016 साली अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या चौकशीत ट्रम्प यांनी बाधा आणण्याचाही प्रयत्न केला होता. राष्ट्राध्यक्ष असल्याने ट्रम्प यातून सुटले होते. या चौकशी समितीचे अध्यक्ष मूलर यांना हटवण्याचा ट्रम्प यांनी केला होता. या प्रकरणीही ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालू शकतो.

वाचा :- नागरिकांनो सावधान! फटाके वाजवल्यास होणार कडक कारवाई

वाचा :- ‘गूगल’पे चं वर्तन अयोग्य; देण्यात आले चौकशीचे आदेश

वाचा :- यंदा दिवाळीमध्ये उडणार 9 चित्रपट आणि वेब सिरीजचा मोठा बार

वाचा :- नटखट जेनेलिया पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला!