राज्यातील शाळा ‘या’ सुरक्षित पद्धतीने होणार सुरु
पालकांची संमती आवश्यक!
10 Nov :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळांची कवाड उघण्यास ठाकरे सरकारने परवानगी दिली आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घेत सुरक्षितपणे शाळा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून घसरणीला लागला आहे. शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करत असताना केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे .40 मिनिटांचे चार तासच शाळा होणार आहे. ही शाळा भरवताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची सुचनाही शिक्षण विभागाने या पुर्वीच जाहीर केल्या आहेत व या सूचनांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत.
वाचा :- मोठी बातमी! उपचारासाठी धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल
शाळा सुरू करण्यापुर्वी जिल्हा प्रशासन व महापालिके द्वारा शिक्षकांची आरोग्य तपासणी होणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजने अंतर्गत आरोग्य चाचणी राज्यात होतच आहे. अशा वेळी शाळेतील वर्ग सुविधा असल्यास खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याचीही मुभा शाळा व्यवस्थापनास दिली आहे. स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांच्या सामुदायिक जबाबदारीवर एक दिवस आड करून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यात येणार आहे. असे करत असताना शिक्षकांनी शिकवताना व विद्यार्थ्यानी शिकताना मास्क घालने बंधनकारक आहे.
वाचा :- नागरिकांनो सावधान! फटाके वाजवल्यास होणार कडक कारवाई
आरोग्य विषयक सर्व नियमांचे पालन शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने केले पाहिजे. कुटुंबातील सदस्य आजारी असलेल्या विद्यार्थ्यांनी व स्वतःचे स्वास्थ्य चांगले नसल्यास खबरदारीचा उपाय म्हणून अशा विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये अशा सूचना ही दिल्या आहेत.
दहावी व बारावीच्या परीक्षा संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत.
वाचा :- याच महिन्यात कोरोना लसीला मिळणार मंजुरी
परिपत्रक:-
राज्यातील इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग दि. 23 नोव्हेंबर, 2020 पासून सुरू
करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच इयत्ता 9 वी ते 12 वी चे वसतिगृह व आश्रमशाळा
विशेषतः आांतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. शाळा सुरु
करण्यापूवी व शाळा सुरु झाल्यानांतर आरोग्य, व सुरक्षाविषयक उपाययोजनाबादच्या मार्गदर्शन सूचना सोबत जोडलेल्या परिशिष्ट- अ परिशिष्ट-ब मध्ये देण्यात आल्या आहेत.
कोवीड -19 बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनाांचे पालन करण्यात यावे.विद्यार्थ्यांच्या
उपस्स्थतीबाबत पालकाांकडून आवश्यक ती लेखी सांमती घेण्यात यावी.
याया विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 15 जुन, 2020 व दिनांक 29 ऑक्टोबर,2020
रोजीच्या परीपत्रकातील सुचनाांचे पालन करण्यात यावे.
सदर शासन परीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत
स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक 202011101642483621 असा आहे.
वाचा :- यंदा दिवाळीमध्ये उडणार 9 चित्रपट आणि वेब सिरीजचा मोठा बार