भारत

नागरिकांनो सावधान! फटाके वाजवल्यास होणार कडक कारवाई

साैम्य फटाके फोडण्यास परवानगी

10 Nov :- कोरोना रुग्णवाढीत घट पडली असली तरी कोरोना विषाणूचे संकट अद्याप टळलेलं नाही. आटोक्यात येत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवाळीमध्ये वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कोरोना रुग्णांमध्ये श्वसनाची मुख्य समस्या असते. फटाक्यांच्या धुराचा त्यांना त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन दिवाळीत मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.नियमाचे उल्लंघन केल्यास महापालिका व पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.

वाचा :- मोठी बातमी! उपचारासाठी धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल

कोरोना संसर्गजन्य असल्याने सर्वानीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर पाळणे, सार्वजनिक ठिकाणी आवर्जून मास्क घालणे, वारंवार साबणाने व्यवस्थित हात धुणे आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांत फुलझडी, अनार असे साैम्य फटाके फोडण्यास परवानगी आहे.

वाचा :- बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यानी केली आत्महत्या

फराळासाठी नातेवाइकांच्या घरी जाणे शक्यताे टाळावे, भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे ओवाळावे.भावानेही ऑनलाइन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाचा :- यंदा दिवाळीमध्ये उडणार 9 चित्रपट आणि वेब सिरीजचा मोठा बार

वाचा :- नटखट जेनेलिया पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला!

वाचा :- कोहलीची ‘विराट’ कमाई केवळ थक्क करणारीच…!