महाराष्ट्र

मोठी बातमी! उपचारासाठी धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल

लवकरच पुन्हा सेवेत दाखल होईन- धनंजय मुंडे

10 Nov :- ऐन दिवाळी सणाच्या भरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीव्र पोटदुखीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून त्यांना होतो आहे. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सध्या धनंजय मुंडे यांनी प्रकृती स्थिर आहे लवकरच पुन्हा सेवेत दाखल होईन असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.

वाचा :- बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यानी केली आत्महत्या

जून महिन्यात धनंजय मुंडे यांना करोनाचीही लागण झाली होती. त्यावेळीही त्यांनी मुंबईच्या रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर ते करोनामुक्त झाले.

वाचा :- याच महिन्यात कोरोना लसीला मिळणार मंजुरी

वाचा :- यंदा दिवाळीमध्ये उडणार 9 चित्रपट आणि वेब सिरीजचा मोठा बार