याच महिन्यात कोरोना लसीला मिळणार मंजुरी
लसीची चाचणी लहान मुलांवरदेखील करण्यात आली
9 Nov :- कोरोना विषाणू कहर काही प्रमाणात आटोक्यात आला असला तरी कोरोना विषाणू अजूनही नष्ट झालेला नाही. कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी जगभरात युद्ध पातळीवर काम सुरु आहे. जगभरातील काही मोजक्याच कोरोना लशींचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
या ट्रायलच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आता एका कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचे परिणाम समोर आले आहेत. Pfizer कंपनीची कोरोना लस तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये 90% प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.त्यामुळे याचं महिन्यात या लसीला मंजुरी मिळणार असल्याची शक्यता आहे.
वाचा :- यंदा दिवाळीमध्ये उडणार 9 चित्रपट आणि वेब सिरीजचा मोठा बार
अमेरिकेतील फायजर कंपनीच्या लशीत जर्मन कंपनी BioNTech ची भागीदारी आहे.प्राथमिक अभ्यासानुसार लशीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांत आणि दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांतच सुरक्षा मिळते. 2020 मध्येच लशीचे 50 दशलक्ष आणि 2021 मध्ये 1.3 अब्ज डोस जगाला पुरवू अशी आशा आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे.विशेष म्हणजे जगातील ही पहिली लस आहे, ज्या लशीची चाचणी लहान मुलांवरदेखील करण्यात आली आहे.
वाचा :- बीडमध्ये आगीचे तांडव; नगर रोड़वरिल LIC ऑफिस जळून खाक!
वाचा :- परभावानंतर ट्रम्प आणि मेलेनियामध्ये होणार घटस्फोट!
वाचा :- पुढील IPL कधी, कुठे होणार? गांगुलीने दिली ‘ही’ माहिती