सिनेमा,मनोरंजन

‘या’ कारणामुळे अर्जुन रामपालच्या घरी NCB चा छापा

काही दिवसांपूर्वीच मेहुण्याला झाली होती अटक

हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता अर्जुन रामपाल याचं नाव वारंवार ड्रुग्स प्रकरणा भौवतली फिरत आहे.बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची धडक कारवाई सुरु असून आता अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकण्यात आली आहे . तसेच या कारवाई दरम्यान अभिनेता अर्जुन रामपालच्या वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

एनसीबीला कारवाईदरम्यान अर्जुनच्या घरात ड्रग्ज सापडले की नाही, याचा अद्याप खुलासा होऊ शकलेला नाही. या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक केली होती.

वाचा :- बीडमध्ये आगीचे तांडव; नगर रोड़वरिल LIC ऑफिस जळून खाक!

दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला एनसीबीने लोणावळ्यातून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर आता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकण्यात आली आहे.

वाचा :- मटन बनवण्यासाठी उशीर झाल्याने नवऱ्याने पाडले बायकोचे दात

वाचा :- परभावानंतर ट्रम्प आणि मेलेनियामध्ये होणार घटस्फोट!

वाचा :- यंदा दिवाळीमध्ये उडणार 9 चित्रपट आणि वेब सिरीजचा मोठा बार