सिनेमा,मनोरंजन

यंदा दिवाळीमध्ये उडणार 9 चित्रपट आणि वेब सिरीजचा मोठा बार

मनोरंजन स्पेशल!

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनारुपी ढगाआड झाकोळल्या गेलेली चित्रपट सृष्टी नोव्हेंबर महिन्यात सिनेरसिकांना मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी देणार आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी अली असली तरी मनोरंजनाचा मोठा बार उडणार आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

भर दिवाळीमध्ये तब्बल 9 चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनोरंजनाच्या या चटकदार मेजवानी समोर सिनेरसिकांना कदाचित दिवाळी सुद्धा फराळ फिक्का लागू शकतो.


लक्ष्मी: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित सिनेमा लक्ष्मी 09 नोव्हेंबरला डिज्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
आश्रम 2 बॉबी देओलच्या आश्रम: या वेब सीरिजचा दुसरा सीझन 11 नोव्हेंबरला एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे.


बिच्छू: मिर्झापूर फेम दिव्येंदू शर्माची नवी वेब सीरिज बिच्छू 18 नोव्हेंबर प्रदर्शित होणार आहे. झी5 वर ही सीरिज तुम्हाला पाहता येईल.
सूरज पे मंगल भारी: हा सिनेमा 13 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मनोज वाजपेयींचा दमदार अभिनय यात बघायला मिळणार आहे.
अभिषेक बच्चनची

ल्यूडो ही फिल्म 11 नोव्हेंबरला नेटफिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नक्सलबाडी: नक्सलबाडी ही एक वेगळ्या धाटणीची वेब सीरिज 28 नोव्हेंबरला झी5 वर प्रदर्शित होणार आहे. राजीव खंडेलवालचा जबरदस्त अभिनय यात पाहायला मिळणार आहे.


छलांग: राजकमार राव आणि नुसरत भरुचा ही जोडी पहिल्यांच छलांग चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. 13 नोव्हेंबरला हा चित्रपट amazon prime वर प्रदर्शित होणार आहे.
मम भाई: 12 नोव्हेंबरला मम भाई ही वेब सीरिज ऑल्ट बालाजी आणि झी5 वर रीलिज होणार आहे.
रात काली हैं: अनुप सोनीची ही वेब सीरिज झी5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.