सिनेमा,मनोरंजन

बाहुबली पुन्हा सिनेमागृहात!

मनोरंजन स्पेशल!

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या चित्रपटगृहाची कवाड उघडण्यास राज्य सरकारनं दिली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

50 टक्के प्रेक्षकसंख्येच्या नियमासह थिएटर्स खुली करण्याला परवानगी दिल्यानंतर अनेक मोठ्या सिनेमांनी पुन्हा एकदा आपल्या प्रदर्शनाची तारीख नव्याने ठरवायला घेतली आहे.

मात्र सध्या लागलीच कोणताही चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने अशातच कमालीचा लोकप्रिय झालेला बाहुबली हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होतो आहे. तर पुढच्या शुक्रवारी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सध्या जरी सिनेमागृहात कुठलाही नवीन चित्रपट नसला तरी दिवाळीच्या या हंगामध्ये अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे.