नटखट जेनेलिया पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला!
मनोरंजन स्पेशल!
आपल्या सोज्वळ रूपाने आणि नटखट अंदाजाने आजही अनेक तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीत यशस्वी पदार्पण करणारी जेनेलिया विवाहानंतर जवळपास हिंदी चिञपट सृष्टीपासून दूरच राहिली. मात्र जाणे तू, तेरे नाल, फोर्स सारखे सुपरहिट चिञपट देणारी जेनेलिया अनेक वर्षांनंतर सुद्धा चाहत्यांची मनात घर करून आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ मनोरंजन जगतातील लाईव्ह अपडेटस
हिंदी चिञपट सृष्टीमध्ये मोजकेच चित्रपट करून सुद्धा जेनिलियाचा चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात तयार झालेला आहे.हिंदी चित्रपट सृष्टीत वर्षभरात अनेक चित्रपट तयार होतात. काही थिएटरमध्ये प्रदर्शित होतात आणि प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरत सुपरहिट देखील होतात. मात्र सर्वच चिञपट प्रदर्शित होतात असं नाही. काही चिञपट प्रदर्शित होण्याअगोदरच बंद पडतात किंवा प्रदर्शन तारखा लांबल्याने सिनेमागृहापर्यंत सुद्धा येत नाहीत.
असाच काहीसा प्रकार बोनी कपूर यांच्या एका सिनेमाबाबतीत झाला आहे. इट्स माय लाइफ या सिनेमाचं नाव आहे. यामध्ये जेनेलिया डिसूझा आणि हरमन बावेजा मुख्य भूमिकेत आहेत. तर नाना पाटेकर आणि कपिल शर्मा यांची देखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. तब्बल 10 वर्षांनी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. 10 वर्षांपूर्वी हा सिनेमा बनून तयार होता, मात्र काही कारणास्तवर तो सिनेमागृह गाठू शकला नाही.
विशेष म्हणजे इट्स माय लाइफ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नसून थेट टेलिव्हिजनवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती सिनेमाचे निर्माते बोनी कपूर यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे. त्यांनी पोस्टर देखील शेअर केले आहे. हा सिनेमा 29 नोव्हेंबर रोजी झी सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. जेनेलियाने देखील या ट्वीटवर आनंद व्यक्त करत ही पोस्ट रीट्वीट केली आहे.
अनीस बज्मी यांनी दिलेल्या माहिती नुसार हा सिनेमा म्हणजे एक चांगली कॉमेडी असणार आहे. कोरोना काळात योग्य वेळी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचे शूटिंग 2007 मध्ये पूर्ण झाले होते. सिनेमागृह असो किंवा टेलिव्हीन जेनेलियाचा चिञपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आधिक प्रमाणात असते हे नक्की