कोहलीची ‘विराट’ कमाई केवळ थक्क करणारीच…!
मनोरंजन स्पेशल!
क्रिकेट असा शब्द जरी समोर आला तर प्रत्येक भारतीयांसमोर पहिल्यांदा नाव येत ते म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर म्हटलं तर पहिल्यांदा समोर उभा राहतं संपूर्ण क्रिकेट विश्व. सचिन आणि क्रिकेट एकजीव झालेलं समीकर तब्बल २५ वर्ष सर्व जगाने केवळ आश्चर्याने आणि कौतुकानेच पाहिलं असे म्हणणे वावगं ठरणार नाही.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ मनोरंजन जगतातील लाईव्ह अपडेटस
भारतीय क्रिकेट इतिहासात सचिनसह सुनील गावस्कर, कपिल देव, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, आणि महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंची नावं क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून आहेतच. मात्र या सर्वांच्या नंतर येऊन क्रिकेट जगतात फलंदाजीच्या जोरावर संपूर्ण जगामध्ये स्वतःच नावं तयार करणारा खेळाडू आणि रनमशीन या नावाने क्रिकेटप्रेमींमध्ये लोकप्रिय असणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली.
जगातील प्रत्येक धारदार गोलंदाजीस झोडून धावांचा पाऊस पडणारा आणि भारतीय संघास विजय मिळवून देणारा फलंदाज म्हणजे विराट कोहली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा नुकताच 32वा वाढदिवस साजरा झाला. विराट हा जगविख्यात असा क्रिकेटपटू आहे की ज्याने सचिन नंतर क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
विराटनी स्वतःला कसोटी क्रिकेटमध्ये, एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि T- 20 क्रिकेटमध्ये सिद्ध केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 86 कसोटींत 7240, 248 एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11,867, तर 81 टी-20 क्रिकेट सामन्यांत 2794 धावा केल्या आहेत. कमी वयातच त्याने उत्तुंग यश मिळवनारा विराट केवळ क्रिकेटरसिकांचा लाडका नाही, तर तो विविध ब्रँड्सचाही लाडका बनलेला आहे. विराट आघाडीचा क्रिकेटपटू असल्यामुळे त्याची ब्रँड व्ह्यॅल्यूही प्रचंड प्रमाणात आहे.
जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत विराटचा या वर्षी 66वा क्रमांक आहे. गेल्या वर्षी आणि या वर्षीही या यादीत स्थान पटकवणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. विराटने 2019 मध्ये अंदाजे 25 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 1,85,64,25,000 रुपये कमवले आहेत. या वर्षी 2020 मध्ये त्याची कमाई 26 मिलियन डॉलर्स म्हणजे 1,93,09,42,000 रुपये इतकी झाली आहे. विराट बीसीसीआयचा A दर्जाचा खेळाडू असून त्याला वर्षाला 1 मिलियन डॉलर्स पगार मिळतो, उर्वरित 1 मिलियन डॉलर्स इतर स्पर्धांचं मानधन, बक्षिसाची रक्कम असे वर्षाला 2 मिलियन डॉलर्स तो क्रिकेटमधून कमवतो. बाकीचे 24 मिलियन अमेरिकी डॉलर्स त्याला ब्रँड एंडोर्समेंटमधून मिळतात.
सोशल मीडियावर त्याचे प्रचंड चाहते आहेत. तो ऑडी, हिरो, एमआरएफ, प्युमा, व्हॅल्व्होलिन अशा अनेक ब्रँड्सचा ब्रँड अम्बॅसेडर आहे. तो आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचाही कर्णधार आहे. आयपीएल 2020 मध्ये आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.
क्रिकेट खेळावर आणि स्वथाच्या फिटनेसवर विशेष मेहनत घेणाऱ्या विराटची विराट कमाई नक्कीच थक्क करणारी आहे. मात्र उत्तुंग यशोशिखरावर असलेल्या माणसाचं यश नेहमी लक्षवेधी असतं त्या यशामागची कठोर परिश्रम जाणणारे बोटावर मोजण्या इतकेच असतात.