सिनेमा,मनोरंजन

श्रद्धा ऐवजी परिणीती दिसारणार सायनाच्या रूपात

मनोरंजन स्पेशल!

9 Nov L- अगोदरच्या काळात सुंदर कथा आणि वजनदार डायलॉग्सने चिञपट तयार होत असे. जुन्या चित्रपटांमध्ये भरमसाठ ऍक्शनसह फाईट सीन्स विशेष लक्षवेधी ठरायची तर सस्पेन्स आणि थ्रिलरने चिञपट प्रेक्षकांची मन जिंकायचा. मात्र बदलत्या काळानुसार प्रेक्षकांची चिञपट पाहण्याची आवड सुद्धा बदलत गेली. तशीतशी सिनेमेकर्सनं सिनेरसिकांची आवड- निवड आभ्यासत निरनिराळ्या विषयांना जोपासणं सुरु केले.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ मनोरंजन जगतातील लाईव्ह अपडेटस

आता हल्लीच्या पीडीमध्ये बायोपिकला सिनेरसिंकांची विशेष आणि अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. जसे की ms धोनी अँटोल्ड स्टोरी, भाग मिल्का भाग, संजू, मेरी कॉम, दंगल अशी अनेक चिञपट सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय ठरली. असाच एक बायोपिक नव्याने सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारत आहे. नुकताच सायनाने बायोपिकमधील परिणीताचा फर्स्ट लूक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये परिणीती हुबेहुब सायनासारखी दिसत आहे. अस्मानी अशी ओळख असणारी सायना भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे.इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. २०१२ मध्ये सायनाने स्वीस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर जून २०१२ मध्ये थायलंड ओपन ग्रां प्री सुवर्ण सन्मान पटकावला.लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये तिने कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला. 2014च्या फाइनलमध्ये जपानच्या अकेन यामागुचीने 21-12, 22-20 असा पराभव करून चीन ओपन सुपर सिरीज प्रीमियर जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

अशा प्रतिभावंत खेळाडूची संघर्षमयी यशोगाथेचा प्रवास परिणितीच्या माध्यमातून रंगेरी पडद्यावर सिनेरसिकांना दिसणार आहे. परिणीती आगोदर सायनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारणार होती. मात्र काही कारणास्तव तिच्या जागी परिणीती चित्रपटात दिसणार आहे. मागील वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. परिणीतीने बॅडमिंटनपटूची भूमिका साकारण्यासाठी सखोल मेहनत घेतली आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये परिणितीने अनेक सुपरहिट चिञपट दिले आहे. परिणितीचा चाहता वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र एखाद्या व्यक्तीची व्यक्तिरेखा मांडणारी भूमिका पहिल्यांदाच परिणीती साकारत असल्याने परिणीती सायनाच्या भूमिकेला कितपत न्याय देत ही उत्सुकता संपूर्ण सिनेसृष्टीला आणि सिनेरसिकांना लागली आहे.