महाराष्ट्र

मोठी बातमी! एका तासात मिळणार एसटी कर्मचाऱ्यांना पगार

एक महिन्याचं वेतन,दिवाळी अग्रीम रक्कम आज दिली जाणार

9 Nov :- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अखेर महामंडळाकडून तातडीने एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचं वेतन आणि दिवाळी अग्रीम रक्कम आज दिली जाणार आहे, अशी घोषणा खुद्द परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना लगेच एका महिन्याचं वेतन देणार, सणासाठी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम तात्काळ देणार आहोत, अशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

परब म्हणाले की, अजून एका पगाराची व्यवस्था दिवाळी आधी करण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये, आम्ही त्यांच्या वेतनासाठी बॅंकेकडे कर्ज देखील मागितले आहे, असं परब यांनी सांगितलं. आज एका तासात कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन मिळेल, त्यामुळं त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये, असं आवाहन परब यांनी केलं. यावेळी परब म्हणाले की, आत्महत्यासारखं कठोर पाऊल उचलू नका. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू. दुःखी होऊन असं कोणत्याही टोकाचं पाऊल घेऊ नये. कुटुंबाला त्याचा त्रास होतो. कुटुंब रस्त्यावर येतं. दिवाळी आधी 1 पगार मिळेल आणि दिवाळीनंतर 1 पगार मिळेल, असं परब म्हणाले.

वाचा :- बीडमध्ये आगीचे तांडव; नगर रोड़वरिल LIC ऑफिस जळून खाक!

परब म्हणाले की, पूर्णपणे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आम्ही वेतनासाठी बँकेकडे कर्ज पण मागितलं आहे. टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होतील. आज 1 तासात 1 पगार आणि सणाचा अनुग्रह मिळेल. आम्ही राज्य शासनाकडे एकरकामी पैसे मागितले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. आता एसटी साठी कोणतंही रक्कम थकीत नाही.

वाचा :- मटन बनवण्यासाठी उशीर झाल्याने नवऱ्याने पाडले बायकोचे दात

राज्य शासनाला प्रस्ताव दिलाय की काही दिवस तरी कर्मचाऱ्यांना पगार द्यावे. त्यामुळं पैसे आणण्याची साधनं वाढवण्यास मदत होईल, असं परब यांनी सांगितलं. एस टी ला राज्यशासनाने मदत केली आहे यापुढेही करेल. पैशांची तजवीज करायला हवी. आज सकाळपासून त्याबाबत बैठक सुरू आहे. 1 पगाराचा प्रश्न सुटला आहे आणि 1 पगाराचा प्रश्न दिवाळीपर्यंत सुटेल. अनेक माध्यमातून पैसे एस टी मध्ये येईल याची प्रयत्न सुरू आहेत. पगार आणि डिझेलमध्ये पैसे खर्च होतात. एक रकमी पैसे आले तर पुढचं प्लानिंग सोप्पं होईल, असं ते म्हणाले.

वाचा :- परभावानंतर ट्रम्प आणि मेलेनियामध्ये होणार घटस्फोट!

वाचा :- पुढील IPL कधी, कुठे होणार? गांगुलीने दिली ‘ही’ माहिती