महाराष्ट्र

IPL मॅचवर सट्टा लावताना ‘या’ माजी क्रिकेटपटूला अटक

पोलिसांनी आयपीएलवर बेटिंग करताना पकडलं

9 Nov :- भारतातील लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेट खेळाला ‘सट्टा’ ही लागलेली कीड आहे. आयपीएल सुरू असताना अनेकवेळा बेटिंगच्या बातम्या समोर येतात. यंदाच्या वर्षीची आयपीएल जरी युएईमध्ये होत असली तरी बेटिंग मात्र कमी झालेलं नाही. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे या बेटिंगमध्ये आता एका क्रिकेटपटूचं नावही समोर आलं आहे. मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला वर्सोवा पोलिसांनी आयपीएलवर बेटिंग करताना पकडलं आहे. याप्रकरणी क्रिकेटपटूला अटकही करण्यात आली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. मॉरिस याने 1995 ते 2007 या कालावधीमध्ये 44 प्रथम श्रेणी आणि 51 लिस्ट ए मॅच खेळल्या होत्या. वर्सोव्यात आयपीएल मॅचवर बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मॉरिसच्या घरातून फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. मॉरिसला कोर्टात हजर करण्याआधी पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

वाचा :- बीडमध्ये आगीचे तांडव; नगर रोड़वरिल LIC ऑफिस जळून खाक!

मॉरिसला आयपीएल बेटिंगच्या आरोपावरुन अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. रॉबिन मॉरिस याच्यावर याआधीही आरोप झाले होते. अल जजिराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्येही रॉबिन मॉरिसवर बेटिंगचे आरोप करण्यात आले होते. रॉबिन मॉरिससोबत पाकिस्तानचा माजी बॅट्समन हसन रजादेखील स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओमध्ये दिसले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये दोघंही टी-20 स्पर्धांमध्ये स्पॉट फिक्सिंग करण्याबाबत बोलत होते. यानंतर मॉरिसने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते, तसंच चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आपण गेल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

वाचा :- मटन बनवण्यासाठी उशीर झाल्याने नवऱ्याने पाडले बायकोचे दात

डिसेंबर 2019 मध्ये मॉरिसला लोन एजंटच्या अपहरणाप्रकरणी चार लोकांसोबत अटक करण्यात आली होती. मॉरिसने मोठ्या प्रोसेसिंग फीवर एका खासगी संस्थेकडून पर्सनल लोनसाठी अर्ज केला होता, पण मॉरिसचा अर्ज बाद केल्यानंतर त्याने एजंटला त्रास दिला आणि त्याचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला.

वाचा :- परभावानंतर ट्रम्प आणि मेलेनियामध्ये होणार घटस्फोट!

वाचा :- पुढील IPL कधी, कुठे होणार? गांगुलीने दिली ‘ही’ माहिती