बीड

बीडमध्ये आगीचे तांडव; नगर रोड़वरिल LIC ऑफिस जळून खाक!

साहित्याचा कोळसा झाला, सुदैवाने जीवितहानी टळली!

9 Nov :- बीड शहरातील नगर रोडवरील LIC ऑफिसला आज पहाटे (सोमवारी) सर्वजण साखरझोपेत असताना भीषण आग लागली. बीडच्या या LIC ऑफिसममध्ये आगीने मोठे तांडव घातल्याने ऑफिस आगीत पूर्णतः जाळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र ऑफिसमधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आनण्याकरिता मोठे प्रयत्न केले.मात्र तोपर्यंत आगीने सर्व ऑफिसला कोळसा बनवून टाकले होते. LIC ऑफिसला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याने. आगीने संपूर्ण ऑफिसमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर तांडव केले. साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. LIC ऑफिसमध्ये आग कशी लागली याचे कारण समजू शकले नाही.

वाचा :- मटन बनवण्यासाठी उशीर झाल्याने नवऱ्याने पाडले बायकोचे दात

वाचा :- परभावानंतर ट्रम्प आणि मेलेनियामध्ये होणार घटस्फोट!

वाचा :- पुढील IPL कधी, कुठे होणार? गांगुलीने दिली ‘ही’ माहिती