महाराष्ट्र

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या विक्रमी

वाढती गर्दी मोठ्या संकटाची संकेत

8 Nov :- राज्यात रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी दिवाळी सणामुळे वाढणारी गर्दी मोठ्या संकटाचे संकेत देऊ लागली आहे. वाढत्या गर्दीमध्ये नागरिक मास्क वापरात नसल्याने कोरोना संक्रमणाचा वेग वाढण्याची दाट शक्यता आहे.राज्यात रविवारी विक्रमी 8 हजार 232 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 5 हजार 92 नवे रुग्ण आढळून आलेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही आता 15 लाख 77 हजारांवर गेली आहे. तर राज्याचा Recovery Rate हा 91.71 एवढा झाला आहे. दिवाळीला 8 दिवस राहिलेले असताना सध्या बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. या गर्दीमुळे सरकारची चिंता वाढली असून कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढू नये म्हणून उपयोजना काय करता येतील याचा विचार सुरू केला आहेराज्यात दिवसभरात 110 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

मटन बनवण्यासाठी उशीर झाल्याने नवऱ्याने पाडले बायकोचे दात

राज्याचा मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे. राज्यातल्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही आता लाखाच्याही खाली आली असून राज्यभरात सध्या 96 हजार 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सातत्याने कोरोनाचा आलेख कमी होतोय. त्यामुळे सगळ्यांना दिलासा मिळाला आहे.

परभावानंतर ट्रम्प आणि मेलेनियामध्ये होणार घटस्फोट!

वाचा :- यंदाची दिवाळी फटाक्यांविना; राज्य सरकारनं जाहीर केली ‘ही’ निअमवाली